दह्याचे बेसन (आंबट बेसनाच्या वड्या)
साहित्य -
- दही आंबट १ वाटी
- बेसन १ वाटी
- १ मोठा कांदा
- ४ - ५ लहसून पाकळ्या
- ४-५ कढीपत्ता पाने
- ५- ६ हिरव्या मिरच्या
- १ चमचा जिरे
- १ चमचा मोहरी
- अर्धा चमचा मेथी दाने
- अर्धा चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- कोथिंबीर
कृती -
सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा, हिरवी मिरची जिरे व लहसून पाकळ्या मिक्सरमधून वाटून घ्यावेत व ते मिश्रण काढून त्याच भांड्यात दही व बेसन एकदा एकजीव फिरवून घ्यावे जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या होणार नाही.
आता गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे तेल गरम होताच त्यामध्ये मोहरी, जिरे , मेथी दाने व कढीपत्ता घालावा मोहरी तडतडली कि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा कांद्याला थोडा सोनरी रंग आला कि त्यामध्ये हिरवी मिरची व लहसून पेस्ट घालावी हे सर्व पदार्थ १-२ मिनिटे परतून घ्यावेत व त्यामध्ये हळद व मीठ घालावे व लगेच मिक्सर मधून फिरवलेले दही व बेसन घालावे व चमच्या ने ते धवळत राहावे,जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत. हवे असल्यास त्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता , बेसन घट्ट ह्वायला लागले कि त्यावर झाकण ठेऊन १० ते १५ मिनिटे बेसन निट शिजवून घ्यावे, आंबट बेसन झाले कि त्यावर कोथिंबीर घालावी.
नंतर एक खोल ताट घेऊन त्या ताटाला तेल पसरून घ्यावे, तेल पसरवले कि , बेसन चमच्या च्या सहाय्याने पसरून थापटून घ्यावे , १ ते २ तास हे ताट असेच बाजूला झाकून ठेवावे व नंतर त्याचा चाकूने छान वड्या पाडून घ्याव्यात.
धन्यवाद !