चवदार मोड आलेली मटकीची उसळ

 चवदार मोड आलेली मटकीची उसळ


                नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये मटकीची उसड कशी बनवायची ते बघणार आहोत. मटकी खाण्याचे बरेचशे फायदे आहेत. आणी  सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्य खाल्याने शरीलाला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात. वजन कमी करायचे असल्यास मोड आलेली कडधान्य आवर्जून खाल्ली पाहिजेत. कडधान्य नियमित पाने खाल्याने शरीलाला पुरेशी उर्जा मिळते. कडधान्या खाल्याने साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. इत्यादी बरेचशे फायदे आपल्याला माहित आहेतच. मटकी हे कडधान्य खूप पौष्टिक आहे,  सर्वच लोक व लहान मुले सुद्धा आवडीने मोड आलेली मटकी ची उसळ खातात.  मोड आलेली मटकी ची उसळ बनविण्यासाठी खूप अशा साहित्याची आवश्यकता नसते खूप कमी साहित्यात हि मटकीची उसड बनून तयार होते, तर पाहुयात मोड आलेल्या मटकी ची उसळ बनविण्यासाठी  लागणारे साहित्य व कृती 

 साहित्य - 

  • मटकी २ वाटी 
  • १ मोठा कांदा 
  • १ टमाटर
  • ४-५ लहसून पाकळ्या 
  • ६-७ कढीपत्ता पाने 
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • अर्धा चमचा मोहरी 
  • अर्धा चमचा जिरे 
  • अर्धा चमचा बडीशेप 
  • अर्धा चमचा हळद 
  • १ चमचा लाल तिखट 
  • १ चमचा धणेपूड 
  • १ चमचा किचन किंग किंवा इतर कोणताही मसाला 
  • चवीनुसार मीठ 
  • कोथिंबीर 

कृती - 

            सर्वप्रथम मटकी एक दिवसभर किंवा १० ते १२ तास भिजत ठेवायची, मटकी नीट भिजली कि त्यामधले पाणी झारून एका सुती कापडामध्ये बांधून एका भांड्यात  ठेऊन वरून झाकण ठेवावे. ती मटकी एक रात्रभर किंवा १० ते १२ तास बांधून उबदार ठिकाणी ठेवावी 

              दुसऱ्या दिवशी किंवा मग १० ते १२ तासानंतर मटकी ला छान मोड येतात व मटकी चविष्ट लागते. सर्वात आधी कांदा , हिरव्या मिरच्या , टमाटर बारीक चिरून घ्यावेत, लहसून चे बारीक काप  करून  घ्यावेत त्यानंतर मटकी ची उसळ बनविण्यासाठी  आता गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घालावी, मोहरी,जिरे, बडीशेप, कडीपत्ता पाने घालावी. मोहरी तडतडताच त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा सोनेरी होये तोवर परतून घ्यावा. कांदा परतून झालाकी, त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर, लाल तिखट, हळद, धने पूड, किचन किंग मसाला, (तुमच्या आवडीचा इतर कोणताही मसाला तुम्ही वापरू शकता) व चीनुसार मीठ व थोडे पाणी घालून हे सर्व पदार्थ दोन ते तीन मिनिटे झाकण ठेऊन शिजवू द्यावे. टमाटर मऊ झाले की, त्यामध्ये मोड आलेली मटकी घालावी व परतून घ्यावी. मटकी मध्ये मटकी शिजेल एवढे आवश्यकतेनुसार पाणी घालावे. साधारण १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर मटकी शिजवून घ्यावी. वरून कोथिंबीर घालावी.    

            मटकी शिजवून  झाली कि प्लेट मध्ये  काढून त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव व १-२ चमचे दह्याने मटकीची चव आणखीनच वाढते. 

अशा प्रकारे चवदार मोड आलेली मटकी ची उसळ आपण बनवू शकतो. 

            धन्यवाद ! 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.