पनीर भुर्जी करी
नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये पनीर भुर्जी करी कशी बनवायची ते बघणार आहोत. बरेच वेळा शाकाहारी लोक रेस्टॉरंट मध्ये गेले कि पनीर भुर्जी ओर्डेर करतात, पनीर भुर्जी ला अधिक पसंती देतात, हि भाजी नान व पराठ्याबरोबर अप्रतिम लागते . रेस्टॉरंट सारखी पनीर भुर्जी घरी जमत नाही असेच महिलांन वाटते परंतु पनीर भुर्जी हि भाजी पनीर पासून बनणाऱ्या सर्व भाज्यान पेक्षा खूप सोपी आहे अगदी सहज व कमी वेळात हि भाजी बनवून तयार होते तर पाहूयात पनीर भुर्जी करी करिता लागणारे साहित्य व कृती
साहित्य -
- २०० ग्रॅम पनीर
- २ पिकलेले टमाटर
- ३-४ हिरव्या मिरच्या
- १ मोठा चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा मोहरी
- चवीनुसार मीठ
- १ मोठा चमचा किचन किंग मसाला
- आवश्यकतेनुसार तेल
मसाला करिता लागणारे साहित्य
- १ कांदा चिरलेला
- ५-६ लहसून पाकळ्या
- २ चमचे किसलेले खोबरे
- १ चमचा जिरे
- २ तमाल पत्रे
- १ चक्रीफुल
- १ चमचा धने
कृती -
सर्वप्रथम भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यावा त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवावा व कांदा, खोबरे तमालपत्रे व धने लालसर भाजून घ्यावे त्यांनतर हे सर्व पदार्थ थंड झाले कि कांदा, लहसून, जिरे, खोबरे चक्रीफुल, तमालपत्रे हे सर्व पदार्थ एकत्रित करून त्यामध्ये थोडे पाणी घालून मिक्सर चा भांड्यातून बारीक वाटून घ्यावे.
त्यानंतर टमाटर बारीक चिरून त्याची पेस्ट करून घ्यावी व हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. पनीर स्वच्छ धुवून बारीक किसणीने किसून घ्यावेत
आता गॅसवर एका कढई तेल गरम करायला ठेवावे तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घालावी, मोहरी तडतडताच त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व आपण केलेली मसाल्याची पेस्ट घालावी तेल सुटेतोवर मसाला निट झाकण ठेऊन हिऊ द्यावा ७ ते ८ मिनिटानंतर तेल सुटायला लागले कि त्यामध्ये टमाटरची प्युरी घालून ३ ते ४ मिनिटे परतून घ्यावी त्यांतर त्यामध्ये लाल तिखट, हळद , किचन किंग मसाला व चवीनुसार मीठ व थेडे पाणी घालून २ ते ३ मिनिटे झाकण ठेऊन सर्व मसाले एकजीव करून घ्यावे व २ ते ३ मिनिटानंतर त्यामध्ये किसलेले पनीर घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून भाजीला दोन उकळ्या काढून घ्याव्यात तर अशा प्रकारे तुम्हाला सहज व सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुर्जी करी करता येते.
धन्यवाद !
waav khup ch yaami
ReplyDeletenice 👍 ji
ReplyDelete