ओल्या नारळाची वडी

 ओल्या नारळाची वडी



           नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखात नारळी पौर्णिमेनिमित्त निमित्त ओल्या नारळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. बहीण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सन म्हणजे राखी पौर्णिमा ! या निमित्ताने आपल्याकडे अगदी सुरवातीपासूनच ओल्या नारळाची वडी बनवण्याची  पद्धत आहे. ओल्या नारळाची वडी चवीला अप्रतिम लागते, तुम्हीही घरचा घरी हा पदार्थ केव्हाही बनवू शकता, खूपच कमी वेळात व कमी साहित्यात हि खुसखुशीत व तोंडात टाकताच विरघळणारी वडी बनून तयार होते. आज मी  तुम्हाला पारंपरिक पद्धतीने ओल्या नारळाची वडी कशी करायची व ते वडी बनवण्या करिता काय काय साहित्य लागते ते पाहुयात 


साहित्य -

  • ४ वाटी ओल्या नारळाचा कीस 
  • २ वाटी साखर 
  • २ चमचे तूप 
  • १ वाटी दुधावरची साय 
  • २ चमचे पिस्त्याचे काप
  • १ चमचे वेलची पूड 


कृती - 

                   सर्वप्रथम ओल्या नारळाची चव किंवा कीस कसा काढून  घ्यायचा ते सांगते,  

              ओल्या नारळाची वडी बनवण्या करिता २ ओले नारळ घ्यावेत . त्या नारळाचा पाठीचा काळपट भाग काढून घ्यावा. असे केल्यास नारळाच्या वडीचा रंग पांढराशुभ्र येतो.त्यानंतर त्या नारळाचे लहान लहान पातळ काप करून मिक्सर चा भांड्यातून बारीक करून घ्यावेत. अशाप्रकारे ओल्या नारळाचा चव किंवा कीस काढता येतो. 

                आता गॅसवर एका कढई मध्ये २ चमचे तूप घेऊन थोडे गरम करून घ्यावेत. तूप गरम झाले की त्यामधे ओल्या नारळाचा कीस घालावा. या खोबऱ्याच्या कीस मध्ये ओलसरपणा असतो, ओलसरपणा कमी होण्यासाठी हा कीस २ मिनीटे चांगला परतून घ्यावा. त्यांनतर त्यामध्ये ओल्या नारळाच्या किसच्या निम्मे साखर घालावी व १ मिनीटे परतून घ्यावे. त्यांनतर त्यामध्ये १ वाटी दुधावरची साय घालावी (जर तुमच्याकडे साय उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्धी वाटी अमुल फ्रेश क्रीम किंवा अर्धी वाटू दूध पावडर घातली तरी काहीही हरकत नाही). नारळाच्या वडीमधे दुधावरची साय घातल्यास वडीची चव अगदी मावा बर्फी सारखी लागते .साखर व साय घातल्यानंतर ५ ते ६ मिनीटे ते मिश्रण सतत परतत राहावे. त्या मिश्रणाचा घट्टसर गोळा होयेतोवर परतत रहावे. हे मिश्रण तयार झाले आहे की नाही हे समजण्यासाठी  थोडासा मिश्रण हातावर घेवून त्याचा गोळा तयार होते का ते पाहावे. मिश्रणाचा गोळा होत असेल तर समजून घ्या की आपले मिश्रण तयार आहे. व ते मिश्रण खाली काढून घ्यावेत. 

                 त्यानंतर एका चौकोनी स्ट्रे मधे किंवा एक थाळी घेऊन त्यावर तूप लावून घावेत. त्यांनतर  एखाद्या वाटीला खालून तूप लावून त्यांचा साहाय्याने हे मिश्रण नीट थापून घ्यावेत व त्यावर पिस्त्याचे काप घालून ते काप ही थापून घ्यावेत. जेणेकरून ते निघून जाणार नाहीत. हे मिश्रण  थोडे गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. त्यांनतर हे मिश्रण ५ तास तसेच झाकून ठेवावेत. व नंतर वड्या ढील्या करून काढून घ्याव्यात.

   अशाप्रकारे तुम्ही ओल्या नारळाची खुसखुशीत वडी घरच्याघरी बनवू शकता.

















Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. खूपच स्वादिष्ट की हो ! मी बनवून पाहिली.

    ReplyDelete