झणझणीत व्हेज कोल्हापुरी
नमस्कार मैत्रिनिनो, आज आपण या लेखात, व्हेज कोल्हापुरी ही भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. ढाबे आणी होटल मध्ये पनीर नंतर कोणती भाजी अधिक पसंत केली जात असेल तर ती म्हणजे व्हेज कोल्हापुरी !
महाराष्ट्रीयन व्हेज कोल्हापुरी ही एक प्रसिद्ध भाजी आहे. ही भाजी चवीला स्वादिष्ट तर लागतेच त्या बरोबर पोष्टिक ही आहे. कारण या भाजी मध्ये पनीर व भाज्यांचा वापर असतो. ही भाजी शाकाहारी लोकं आवर्जून खातात. मात्र, ही भाजी झणझणीतच चांगली लागते. हि भाजी आपण पोळी, भाकरी, भात किंवा नान सोबत खाऊ शकतो.
आज आपण हॉटेल सारखी घरगुती पद्धतीने व्हेज कोल्हापुरी ही भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर पाहूया साहित्य व कृती.
साहित्य :-
- २ कांदे उभे चिरलेले
- २ टमाटर मोठे चिरलेले
- १२५ ग्रॅम मोठे पनीर तुकडे
- अर्धी वाटी मटर
- अर्धी वाटी गाजर तुकडे
- अर्धी वाटी शिमला मिर्च तुकडे
- १ वाटी आलू मोठे तुकडे
- पाव वाटी फरसबी चे तुकडे
- १ वाटी फुल कोबी मोठे तुकडे
- ७- ८ लहसून पाकळ्या व आल्याचा तुकडा
- २ चमचे लाल तिखट
- अर्धा चमचा हळद
- १ चमचा धने पावडर
- तेल २ वाटी
- दोन चमचे कांदा लहसून मसाला
- ४ ते ५ बेडगी मिरची
- चवीनुसार मीठ
- १ मोठा चमचा बटर
मसाला बनविण्या करिता साहित्य
- १ चमचा खसखस
- २ दालचिनी तुकडे
- २ लवंग
- २ मसाला वेलची
- २ तमाल पत्र
- २ चक्री फुल
- १ कलमी तुकडा
- १० ते १२ काजू तुकडे
कृती :-
सर्व प्रथम लहान भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन चार ते पाच बेडगी मिरची १५ -२० मिनिटे त्यात टाकून ठेवावी. असे केल्यास भाजीचा रंग सुरेख येतो.
त्यानंतर भाजीसाठी ग्रेव्ही तयार करुन घ्यावी. त्यासाठी शेगडीवर एका कढई मध्ये २ चमचे तेल गरम करायला ठेवावे, तेल गरम झाले की, त्यामध्ये एक तमाल पत्र १ दालचीनी तुकडा १ कलमी तुकडा २ वेलची २ लवंग १ चमचा जिरे व २ उभे चिरून घेतलेले कांदे घालावे. मध्यम आचेवर हे सर्व पदार्थ कांद्याला सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये ७ ते ८ लहसून पाकळ्या , आल्याचा तुकडा व टमाटर घालून १० ते १२ मिनिटे टमाटर मऊ होई पर्यंत परतून घ्यावे. मसाला थोडा थंडा झाला की, त्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली बेडगी मिरची घालून या सर्व पदार्थाचे मिक्सर मधून वाटन करून घ्यावे.
त्यानंतर, साहित्यात दिलेल्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून भाज्यांचे मोठे-मोठे काप करून घ्यावे. त्यानंतर, १ कढई मध्ये अर्धी वाटी तेल घालून ह्या सर्व भाज्या ४ ते ५ मिनिटे नीट परतून घ्याव्यात. त्याच कढई मध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घ्यावे, व त्यामध्ये १ मोठा चमचा बटर घालावं. याभाजी मध्ये बटर घातल्यास अगदी हॉटेल सारखी चव येते. बटर गरम झाले की, त्यामध्ये सर्वात आधी खडे मसाले घालावे. त्यामध्ये १ चक्रीफुल, १ दालचीनी तुकडा,१ तमाल पत्र व २ सुक्या मिरच्या घालून १ मिनिटे परतून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये आपण केलेल्या मसाल्याचे वाटन घालून ४ ते ५ मिनिटे परतून घ्यावे. मासाल्यातून तेल सुटले की, त्यामधून २ चमचे कांदा लहसून मसाला, अर्धा चमचा हळद, २ चमचे लाल तिखट व चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर थोडं गरम पाणी घालवे. ही भाजी थोडी घट्टसर असते त्यामुळे पाणी कमीच घालावे. ५ मिनिटे ही ग्रेव्ही शिजवून घ्यावी. त्यानंतर आपण तळून घेतलेल्या भाज्या घालाव्यात. सर्व भाज्या ग्रेव्हीमध्ये एकत्रित करून घ्याव्यात आणि झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवून घ्यावी जेणे करून मसाल्याचे फ्लेवर भाज्यामध्ये उतरेल.
अशा प्रकारे आपण हॉटेल व ढाब्या सारखी घरगुती पद्धतीने झणझणीत व्हेज कोल्हापुरी ही भाजी बनवू शकतो. तर तुम्हीही करून पाहा.
धन्यवाद !
simple and easy.
ReplyDeleteThank you
Delete