बेसनाचे धिरडे
नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये बेसनाचे धिरडे कसे बनवायचे ते बघणार आहोत, बेसनाचे धिरडे हे खूप कमी वेळात झटपट होणारा पदार्थ आहे, मुलांनाहि आवडेल असा हा पदार्थ आहे , आपण सकाळच्या नास्त्यासाठी किंवा मग मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा सॉस बरोबर हे बेसनाचे धिरडे बनवून देवू शकता, हे धिरडे डोस्या सारखेच कुरकुरीत व जाळीदार येतात, खायला हि छान लागतात. बेसन धीरड्यालाच बेसन पोळी किंवा बेसनाचे घावन अशी म्हणतात.तर बेसनाचे धिरडे बनवायला काय काय साहित्य लागते व ते बनवायला काय काय साहित्य लागते ते पाहूयात..
साहित्य -
- १ वाटी बेसन
- १ मोठा चमचा बारीक रवा
- अर्धी वाटी तेल
- २ ते ३ लहसून पाकळ्या
- २ ते ३ हिरव्या मिरच्या
- अर्धा लहान चमचा हळद
- १ चमचा जिरे
- अर्धा चमचा ओवा
- अर्धी वाटी तेल
- कोथिंबीर
- धने पावडर
- अर्धा चमचा लाल तिखट
- पाव चमचा हळद
- चवीनुसार मीठ
कृती :-
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात २ ते ३ हिरवी मिरची,२ ते ३ लहसून पाकळ्या, जिरे ,ओवा व कोथिंबीर हे सर्व पदार्थ घालून जाडसर वाटण करून घ्यावे.
त्यानंतर धिरड्याचे पीठ बनवाण्यासाठी एका भांड्यामध्ये १ वाटी बेसन, १ मोठा चमचा रवा, तयर केलेली लहसून हिरवी मिरचीचे वाटण हळद,लाल तिखट ,धणेपूड,कोथिंबीर व चवीपुरते मिठ घेवून सर्व पदार्थ एकत्रित करून घ्यावेत. त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यावे, म्हणजे मग त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत, खूप घट्ट नाही आणि खूप पातळ हि नाही अस हे पीठ तयार करून घ्यावे. ५ ते १० मिनिटे हे मिश्रण असेच बाजूला ठेवावे.
त्यानंतर शेगडीवर नॉन स्टिक तवा (तुम्ही साधा तवाही वापरू शकता). मध्यम आचेवर गरम करायाला ठेवावा. त्यांतर सर्व तव्याला ब्रश च्या सहय्याने तेल पसरून घ्यावे जेणेकरून धिरडे चिकटणार नाहीत. त्यानंतर ते पीठ पातळसर पसरून दोन्ही बाजूने हे धिरडे भाजून घ्यावेत.
अशाप्रकारे बेसनाचे धिरडे आपण झटपट बनवू शकतो.
धन्यवाद !
wah ! what to say. testy
ReplyDeleteThank you
Delete