तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे

                     तांदूळ  व  मिश्र डाळीचे आप्पे 



                        नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत, आप्पे म्हटलं कि, सर्वाच्याच  तोंडाला तोंडाला पाणी सुटत.सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे खायला कोणाला नाही आवडणार, आता तर आप्पे बाहेरही  मिळायला लागले, बहुतांश लोक त्याचा आस्वादही घेत आहेतच. परंतु, घरी बनवलेल्या आप्प्पेची चवच निराळी लागते. गरमागरम आप्पे व त्याबरोबर दही, सॉस किंवा मग नारळाच्या चटणी सोबत तर, आप्पेची चव दुपटीने वाढते. आप्पे वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येतात. आज आपण या लेखामध्ये टमाटर, कांदा न घालता खूप सोप्पे, मऊ, लुसलुशीत आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर मिश्र डाळीचे आप्पे बनवायला काय काय साहित्य लागते व ते कशाप्रकारे बनवायचे ते पाहूयात.

        साहित्य -

  • १ वाटी तांदूळ 
  • अर्धी वाटी उळद डाळ  मोगर
  • अर्धी वाटी मुंग डाळ मोगर 
  • अर्धी वाटी बरबटी डाळ मोगर 
  • अर्धी वाटी चना डाळ मोगर
  • १ वाटी तेल 
  • १ वाटी बारीक चिरलेले कढीपत्ता पाने 
  •  १ वाटी कोथिंबीर
  • २ चमचे मोहरी 
  • २ चमचे जिरे 
  • ९ ते १० हिरव्या मिरच्या 
  • अर्धा चमचा हिंग
  • अर्धा चमचा खाण्याचा सोडा 
  • २ चमचे साखर
  • चवीनुसार मीठ         

           
                                                                                                                                                         कृती - 
                      सर्वप्रथम  १ मोठ्या भांड्यात तांदूळ , मुंग डाळ, उळद डाळ, चना डाळ व बरबटी डाळ ह्या सर्व डाळी व तांदूळ  ५ ते ६ तास भिजत ठेवावे. त्यानंतर भिजलेल्या  डाळी व तांदूळ  मिक्सरच्या भांड्यातून थोडे थोडे करून काढावेत. मिश्र डाळीचे मिश्रण हे रवाळ ठेवावे, (हे मिश्रण खूप घट्ट किंवा मग खूप पातळ केरु नये).

                        साधारणत: १० ते १२ तास किंवा एक रात्रभर हे मिश्रण आंबवून घ्यावे. मिश्रण नीट आंबवल्या गेले तर आप्पे छान जाळीदार व मऊ बनतात, व सोडा टाकायचे काम पडत नाही.

                        मिश्रण फुलेले कि, त्या मिश्र डाळीच्या मिश्रणात टाकण्यासाठी तडका करून घ्यावा. 
सर्वप्रथम शेगडीवर एका लहान कढई मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवावे,तेल गरम झाले कि त्यामध्ये हिंग, मोहरी ,जिरे ,कढीपत्त्याचे पाने व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून तो गरम तडका झाल्याबरोबर त्या मिश्रणामध्ये एकत्रित करून फेटून घ्यावे. त्यानंतर त्या मिश्रणात थोडासा सोडा,चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून एकत्रित करून घ्यावेत. 

                        त्यानंतर दह्याला पण तडका घालून घ्यावा त्यासाठी, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दही, जिरे, मीठ,साखर, व कोथिंबीर घालून ते मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यानंतर मोहरी ,जिरे कढीपत्ता व हिरव्या मिरच्या घालून दह्यालाही तडका घालून घ्यावा. (तुम्ही यामध्ये १० ते १२ भाजलेले शेंगदाणे हि टाकू शकता).

                        त्यांनतर शेगडीवर मध्यम आचेवर आप्पे पात्र गरम  करायला ठेवावे, त्यामध्ये २ ,२ थेंब तेल टाकून मिश्र डाळीचे मिश्रण त्यामध्ये  थोडे थोडे मिश्रण टाकावे. मंद आचेवर दोन्ही  बाजूने आप्पे नीट भाजून घ्यावे. व आपण केलेल्या तडका दिलेल्या दह्याबरोबर गरमागरम खायला घ्यावे.

                        अशाप्रकारे आपल्याला तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे बनविता येतात, तुम्हीही ट्राय करून पाहा.
                
                                धन्यवाद ! 

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.