रव्याचा शिरा
नमस्कार मैत्रिनिनो आज आपण या लेखामध्य मऊ रव्याचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. शिरा हा खूप लोकांना आवडणारा एक सोपा पदार्थ आहे. हा गोड पदार्थ, लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोकं आवडीने खातात. शिऱ्याची चव सुरेख लागते. आपण नाश्त्यासाठी पण शिरा बनून खाऊ शकतो, खास करून शिऱ्याचा प्रसादासाठी विशेषतः सत्यनारायण पूजनासाठी हा पदार्थ बनविल्या जातो. तर रव्याचा शिरा बनविन्यासाठी काय-काय साहित्य लागते ते पाहूया.
साहित्य :-
- १ वाटी तूप
- १ वाटी रवा
- १ वाटी साखर
- ३ वाटी गरम पाणी
- १ चमचा काजू तुकडे
- १ चमचा बादाम तुकडे
- १ चमचा मनुका
- १ चमचा वेलची पूड
कृती :-
सर्व प्रथम १ वाटी रवा चाळणीने चालून घ्यावा.(शिरा बनविण्यासाठी शक्यतोवर बारीक रवा वापरावा जेणे करून शिरा मऊसर येईल.)
शेगडीवर एका कढई मध्ये १ वाटी तूप घालावे. तूप थोडं गरम झालेलं की, त्यामध्ये रवा मध्यम आचेवर गुलाबी वा सोनेरी रंग येई पर्यंत, तसेच रव्याचा व तुपाचा खमंग वास सुटे पर्यंत भाजून घ्यावा. रवा मध्यम आचेवरच भाजावा जेणे करून तो करपणार नाही. त्यानंतर शेगडीवर दुसऱ्या बाजूने उकडलेले गरम पाणी करून घ्यावे. (थंड पाणी घातले तर शिरा चिकट होऊ नये यासाठी, हि काळजी घ्यावी.) त्यानंतर रवा गुलाबीसर झाला की, त्यामध्ये गरम पाणी घालावे. नंतर त्यामध्ये, काजू बादाम व मनुका घालून, सर्व पदार्थ एकत्रित करून घ्यावे. रव्यामधले पाणी पूर्णतः आटले की, त्यामध्ये १ वाटी साखर व वेलची पूड घालावी. पाच मिनिटे शिरा मध्यम आचेवर शिजवून घ्यावा. वरून एक चमचा तूप घालावे. (काजू बादाम आपण तुपामध्ये परतून ही टाकू शकतो, याने त्याची चव आणखीही छान लागेल.)
अशा पद्धतीने कमी वेळात अगदी झटपट आपण रव्याचा शिरा नाश्त्याला, अचानक आलेल्या पाहुण्याकरिता, प्रसादाकरिता बनू शकतो.
धन्यवाद !