मटर पनीर

                               मटर पनीर 




                नमस्कार  मैत्रिणींनो आज आपण मटर पनीर भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. पनीर खाणे हे शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे.पनीर पासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनविता येतात.वेगवेगळ्या पद्धतीने पनीर चा भाज्या बनविल्या जातात. मटर पनीर हे तुम्ही भात, नान,पराठा, फुलके,पोळी इत्यादी.सोबत खाऊ शकता, आपल्या कडे कोणत्याही कार्यक्रमामध्ये मटर पनीर ची भाजी चा समावेश होतो. मोठ्या आवडीने व चवीने लोक मटर पनीर चा आस्वाद घेतात. रेसटॅारन्ट सारखी मटर पनीर ची भाजी आपण घरीही बनवू शकतो. व त्याचा आनंदही घेवू शकतो.  तर मटर पनीर ची भाजी बनवायला काय काय साहित्य लागते व हि भाजी कशी बनवायची ते पाहूयात.  

साहित्य

  • १ वाटी तेल 
  • पनीर २०० ग्रॅम  
  • १ वाटी मटर 
  • १ टमाटर
  • ४ मध्यम आकाराचे कांदे 
  • ३ ते ४ आल्याचे तुकडे 
  • ५ते ६ लहसून पाकळ्या 
  • २ चमचे धणेपूड 
  • २ चमचे किचन किंग मसाला 
  • बटर 
  • चवीनुसार मीठ 
  • कोथिंबीर 

कृती -


               सर्वप्रथम गॅसवर एका कढईमध्ये १चमचा  तेल गरम करायला ठेवावे, तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा घालावा, १ ते २ मिनिटे कांदा नीट परतून घ्यावा, व त्यांतर आल व लह्सुन परतून  घ्यावा. कांदा,आल व लहसून या सर्व पदार्थांना हलकासा सोनेरी रंग येपर्यंत  साधारणता ५ ते ६ मिनिटे परतून घ्यावे परतून घ्यावे, त्यानंतर  १ बारीक चिरलेला टमाटर घालून ३ ते ४ मिनिटे सर्व पदार्थ परतून घ्यावेत. थोडं थंड झाले कि या सर्व पदार्थाची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी.

             गॅसवर एका कढईमध्ये बटर किंवा तेल घालावे ते गरम होताच त्यामध्ये मसल्याची पेस्ट घालावी ( रेसटॅारन्टमध्ये कोणतीही डिश बटर घालूनच होते, म्हणून त्या डिश घराच्यापेक्षा छान लागतात,तुम्ही इथे तेल घातले तरी काहीही हरकत नाह ). मसाल्याची पेस्ट ५ ते ६ मिनिटे नीट परतून घ्यावी. मसाला झाला कि त्यामध्ये २ चमचे धणेपूड, २ चमचे  लाल तिखट,  अर्धा चमचा हळद व २ चमचे किचन किंग मसाला घालावा ( भाजीचा  रंग छान  येण्याकरिता तुम्ही इथे काश्मिरी लाल तिखट घालू शकता ).

                     हे सर्व मसाला २ ते ३ मिनिटे परतून घ्यावा व चवीनुसार मीठ घालावे.  (आपण यामध्ये टमाटर घातले आहे तर, टमाटर चा आंबट पण घालवण्याकरिता तुम्ही थोडीशी साखर घालू शकता). सर्व मसाला एकत्रित परतून झाला कि त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे पाणी घालून मटर व पनिर चे तुकडे घालून , ४ ते ५ मिनिटे झाकण ठेऊन १ ते २ उकळी येऊ द्यावी, वरून  सजावटीसाठी कोथिंबीर घालावी. अशाप्रकारे मटर पनीर भाजी आपल्याला बनविता येते. 

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सोपी पद्धत.
    चांगल समजल

    ReplyDelete
  2. Khup Chan 👌 Mam🤩
    Keep it up

    ReplyDelete