पालकाचे पराठे
नमस्कार मैत्रिनिनो आज आपण या लेखात पालक पराठा कसा बनवावा हे बघणार आहोत. पालक पराठा हा एक शाकहारी पदार्थ आहे, पालक हे शरीरासाठी खूप पोष्टिक आहे.आपण सहसा नाश्त्याला डिनरला किंवा मधात केंव्हाही मुलांना भूक लागली तेव्हा , खूप कमी वेळात पालक पराठे मुलांना तयार करून देवू शकतो. टमाटर चटणी, दही,लोणचे, सॉस सोबत पालकाचे पराठे चविष्ट लागतात, आणि हिरव्या मिरच्याच्या ठेच्या सोबत तर पालक पराठ्याची चव दुपटीने वाढते,अस म्हणायला काही हरकत नाही. पालकाचे पराठे बनविणे खूप सोपे आहे अगदी कमी साहित्यामध्ये व झटपट होणारे हे पराठे आहेत तर, जाणून घेउया पालक पराठे कसे बनवायचे व ते बनवायला काय काय साहित्य लागते.
साहित्य :-
- २ वाटी गव्हाचं पीठ
- १ जुडी पालक
- १ वाटी तेल
- १ चमचा जिरेपूड
- १ चमचा धणेपूड
- १ चमचा बडीशेप
- १ चमचा गरम मसाला
- १ चमचा ओवा
- १ लहान चमच हळद
- कोथिंबीर (अर्धीवाटी चिरलेली)
- १ चमच कस्तुरी मेथी
- ६-७ हिरव्या मिरच्या
- १ चमचा आलं
- ५-६ लहसून पाकळ्या
कृती :-
सर्वप्रथम पालकाचे देठ तोडून, २-३ वेळा हि पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत.उकळत्या पाण्यात १ चमचा मीठ घालून त्यात ही पाणे केवळ २ मिनिटे उकळून घ्यावीत. त्यानंतर लगेच एका भांड्यात थंड बर्फ टाकलेले पाणी घ्यावे. व ती उकडलेली पालकची पाणे थंड पाण्यात घालावी. (पालकाची पाणे थंड पाण्यात घातल्याने त्यांचा रंग ठीकून राहील.) त्यानंतर ती पाने निथळून घ्यावीत. आलं, लहसून, मिरच्या, पालकाची पाने मिक्सर भांड्यात घेऊन एकदम बारीक पेस्ट करून घ्यावी. आता एक परातीत गव्हाचं पीठ पालकाची पेस्ट, धणेपूड, गरम मसाला, ओवा,कस्तुरी मेथी, बडीशोप, कोथिंबीर, हळद, व चवीनुसार मीठ घालून, हे सर्व पदार्थ एकत्रित करून घ्यावे. नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ नीट मळून घ्यावं. हा पिठाचा गोळा २०-२५ मिनिटे तसाच ठेवायचा.
शेगडीवर तवा गरम करण्यासाठी ठेऊन, १ लहान गोळा घेऊन पोळी सारखा पराठा लाटून घ्यावा. तुम्ही या गोळ्याच्या लहान लहान पुऱ्या करून तेलातून तळून घेऊ शकता. पराठा तव्यावर भाजताना १,१चमचा तेल लावून नीट भाजून घ्यावीत. (तुम्ही या गोळ्याच्या लहान लहान पुऱ्या लाटून त्या तेलातूनही तळून घेऊ शकता)
अशा पद्धतीने पालकाचे पराठे तयार करून गरमागरम खायला घेऊ शकता.
धन्यवाद!