हॉटेल स्टाईल सांबर

 हॉटेल स्टाईल सांबर



 

                नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण या लेखामध्ये हॉटेल स्टाईल सांबर कसा बनवायचा ते पाहणार आहोत. सांबर हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे,  आणी भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे. आणी सर्व ठिकाणी हा पदार्थ आवडीने खातात. अगदी सहज व कमीत-कमी वेळात सांबर बनवून तयार होतो. इडली, डोसा, उतप्पा, किंवा मेदुवडा या कशासोबताही सांबरची चव छानच लागते. बरेचदा आपण घरी सांबर बनवीत असतो, परंतु त्याची चव मात्र हॉटेलसारखी लागत नाही. कधी आपल्या भाज्यांचे प्रमाण चुकते तर कधी डाळीचे प्रमाण चुकते म्हणून आपला परफेक्ट सांबर बनत नाही. सांबर हा पदार्थ बनविण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही. सांबर बनविण्यासाठी लागणारे साहित्य सहज बाजारात मिळते. तर पाहूयात सांबर बनविण्यासाठी लागणारे साहित्य, व कृती.  

साहित्य - 

  • अर्धीवाटी तूर डाळ 
  • १ मोठे टमाटर (बारीक चिरून) 
  • १ मोठा कांदा  (बारीक चिरून) 
  • १ चमचा आल लहसून पेस्ट 
  • ४ - ५ कढीपत्ता पाने 
  • १/२ चमचा मोहरी 
  • १/२ चमचा मेथी दाने
  • १/२ चमचे हळद 
  • १/२ चमचे हिंग 
  •  २ चमचे लाल तिखट  
  • २ सुक्या लाल मिरच्या 
  • १ चमचा धणेपूड 
  • १ वाटी तेल 
  • २ चमचे सांबर मसाला 
  • ३ - ४ चमचे चिंच कोळ
  • चवीनुसार गुळ
  • चवीनुसार मीठ 

भाज्या

  • १ वाटी दुधी भोपळा ( मोठे काप )
  • १ वाटी गाजर ( मोठे काप )
  • १ वाटी कोहळ ( मोठे काप )
  • १ वांगे ( मोठे काप )
  • १ बटाटा ( मोठे काप )
  • २ शेवगाच्या शेंगा ( मोठे काप 

        

कृती - 

             सर्वप्रथम एका कुकरमध्ये अर्धी वाटी धुतलेली तुर डाळ घालावी . त्यांनंतर कुकरमध्ये दुधी भोपळा, कोहळ,गाजर,शेवगाच्या शेंग्या, बटाटा,वांग ह्या सर्व भाज्यांचे काप व आवश्यकतेनुसार पाणी घालून भाज्या व डाळ नीट एकजीव शिजवून घ्यावी .(तुम्ही तुमचा आवडीनुसार भाज्या घालू शकता) . कुकर थंड  झाला कि भाज्या हलक्याशा स्मॅॅश करून घाव्यात 

                     त्यानंतर गॅसवर एका कढई मध्ये तेल गरम करायला ठेवावे, तेल गरम झाले कि त्यामध्ये हिंग व मोहरी  घालावी , नंतर  कढीपत्ता पाने, मेथी दाने व  सुक्या मिरच्या १ मिनिटे परतून त्यामध्ये कांदा घालावा, कांदा परतून झाला कि लहसून पेस्ट घालावी, कांदा व लहसून पेस्टला सोनेरी रंग आला कि टमाटर घालावे. १ -२ मिनिटे टमाटर परतून झाले कि त्यामध्ये लाल तिखट, हळद, हिंग, धनेपूड ,सांबर मसाला व चवीनुसार मीठ घालावे. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून २-३ मिनिटे झाकण ठेवून सर्व सुके पदार्थ तेल सुटेपर्यंत परतून घ्यावेत. त्यानंतर कुकरमध्ये शिजवलेल्या भाज्या घालून त्यामध्ये चिंचेचे कोळ  व आवश्यकतेनुसार गुळ घालून २  ते ३ उकळी आल्यांनतर गॅस बंद करावा.  तर अशाप्रकारे आपण हॉटेल स्टाईल सांबर घरच्या - घरी बनवू शकतो तुम्हीही ट्राय करून पह व कळवा.

              धन्यवाद ! 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.