नमस्कार मैत्रीनिंनो आज आपण पाव भाजी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत, चमचमीत अश्या पावभाजीच नाव जरी ऐकलं कि तोंडाला पाणी सुटल्यासारख होत, पावभाजी हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे, महाराष्ट्रातील लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हणून पावभाजी प्रसिद्ध आहे. बाहेर जावून पाव भाजी खाण्यासाठी लहान मुल नेहमीच हट्ट करत असतात, आपल्यालाही कधी कधी पावभाजी खाण्याची इच्छा होतेच, नेहमी - नेहमी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरी पावभाजी बनवून खाणे केव्हाही योग्यच आहे. मुले तशी भाज्या खाण्याचा कंटाळा करतात पण पाव सोबतची भाजी मुलांना नक्कीच आवडते, त्यामधे सर्व भाजीच्या मिश्रणाची चव अप्रतिम लागते, खूपच सोप्या पद्धतीने आपण पावभाजी बनवू शकतो. आपण आज दोन प्रकारच्या पावभाजी पाहणार आहोत तर पावभाजी बनवायला काय काय साहित्य लागते व कशी बनवायची ते पाहूयात.
साहित्य-
- ४ साल काढलेले बटाटे
- २ टमाटर बारीक चिरलेले
- २ सिमला मिरच्या चिरलेल्या
- १ बीट चे तुकडे
- १वाटी फुल कोबी चिरलेली
- १/२ वाटी गाजर तुकडे
- १/२ वाटी मटार
- १वाटी तेल
- २ कांदे चिरलेले
- १चमचे आल, लहसुन पेस्ट
- १ चमचा हळद
- २चमचे लाल तिखट
- ४ चमचे पावभाजी मसाला
- १ चमचा आल लाहसून पेस्ट
- १/२ चमचे मोहरी
- १/२ चमचे जिरे
- १/२ चमचे धणेपूड
- मीठ चवीनुसार
- कोथिंबिर
- १ लिंबुचा रस
कृती -
सर्वप्रथम आपण बटाटे, सिमला मिरची,फुलकोबी, टमाटर, मटार, बीट ह्या सर्व भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. नंतर ते सर्व भाज्या बारीक चिरून एका कुकर मध्ये घालाव्यात, नंतर कुकर मध्ये भाज्या बुडेल एवढे पाणी घालून ,त्यात थोडे मीठ हलून सर्व भाज्या शिजवून घ्याव्या.. भाज्या शिजल्यानंतर कुकर उघडुन त्या भाज्या आपण काढून घेऊन त्या स्मॅशर चा मदतीने स्मॅश करून घ्याव्यात.
आता गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी जीर घालावे मोहरी तडतड होताच कांदा घालावा, कांदा थोडा सोनिरी रंगाचा झाला कि त्यामध्ये आल, लहसून ची पेस्ट घालावी व नीट परतून घ्यावी . हे कांदा व आल लहसून परतून झाले कि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले टमाटर घालावे , सर्व पदार्थ एकजीव होऊ द्यावेत , नंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, धनेपूड, पावभाजी मसाला चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ तेल सुटेपर्यंत परतून घ्यावेत. . नंतर त्यामध्ये आपण स्मॅश केलेल्या सर्व भाज्या एकत्रितघालाव्यात . गरज वाटल्यास त्यात थोडे गरम पाणी टाकावे, व त्याला चांगली उकळी येऊ ध्यावी. पाव भाजी झाली कि, बटर व लिंबूचा रस व कोथिंबीर घालावी. अशाप्रकारे, आपली चमचमीत पावभाजी खाण्यासाठी तयार आहे
दुसरी पद्धत:-
साहित्य -
- ४ साल काढलेले उकळलेले बटाटे
- २ टमाटर बारीक चिरलेले
- २ सिमला मिरच्या बारीक चिरलेल्या
- १ बीट खीसलेले
- १वाटी फुल कोबी वाफवलेली
- १/२ वाटी गाजर तुकडे
- १/२ वाटी मटार वाफवलेले
- १ वाटी तेल
- २ कांदे चिरलेले
- २ चमचे आल, लहसुन पेस्ट
- १ चमचा हळद
- २चमचे लाल तिखट
- ४ चमचे पावभाजी मसाला
- १ चमचा आल लाहसून पेस्ट
- १/२ चमचे मोहरी
- १/२ चमचे जिरे
- १/२ चमचे धणेपूड
- मीठ चवीनुसार
- कोथिंबीर
- १ लींबुचा रस
- १/ २ चमचे बटर
सर्वप्रथम गॅसवर एका कधी मध्ये २ चमचे तेल टाकून मोहरी जिरे घालावे (तुम्ही तेल ऐवजी बटर हि घालू शकता ) त्यानंतर कांदा घालावा कांदा थोडा सोनेरी होत आला कि, आल लहसून पेस्ट घालावी ,कांदा आणीन लहसून पेस्ट झाली कि त्यामध्ये बारीक चिरलेली सिमला मिरची घालावी २ ते ३ मीन ति छान परतून घ्यावी.त्यांतर टमाटर घालावे (तामातर शक्यतोवर पिकलेलेच घालावे कारण कच्च टमाटर वापरले तर भाजीची चव बदलते ). त्यानंतर अर्धी वाटी मटार , वाफवलेले गाजराचे तुकडे व वाफवलेले बीट घालावेत . व सर्व भाज्या ५ ते ६ मिनिटे नीट शिजवून घ्यावीत. भाज्या शिजेपर्यंत कोबी व बटाटा स्मॅश करून घ्यावा.भाज्या शिजल्या कि कोबी व बटाटा पण त्यामध्ये परतून घ्यावा त्यानंतर, तिखट, हळद, धणेपूड, पावभाजी मसाला व चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ एकजीव होयेपर्यंत परतावे (तुम्ही काश्मिरी लाल तिखट वापरू शकता , त्याने भाजीला सुरेख रंग येतो). त्यांतर त्यामध्ये १ वाटी पाणी घालून ति भाजी स्मॅशर चा मदतीने नीट स्मश करून घावी व ४ ते ५ मिनिटे नीट शिजवून घ्यावी व लिंबूचा रस घालावा, शेवटी बटर घालावे सजावटीसाठी कोथिंबीर घालावी. वरीलपैकी कोणत्याही प्रकारे तुम्ही चमचमीत पावभाजी बनवू शकता, तर करून पाहा.
धन्यवाद !