झणझणीत वांग्याचे भरीत
नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखात झणझणीत वांग्याचे भरीत कसे बनवायचं ते पाहणार आहोत. महाराष्ट्रात वांग्याचे भरीत फार आवडीने खाल्ले जाते. खानदेश मधील वांग्याचे भरीत तर खूप प्रसिद्ध आहे. खासकरून हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे वांगे बाजारात मोठ्या प्रमाणात येतात . वांग्याचे भरीत चवीला अप्रितम लागते. बाजरीच्या भाकरीसोबत व ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच स्वादिष्ट लागते.वांग्याचे भरीत खूप कमी साहित्यात व झटपट बनून तयार होते. तर पाहूयात पारंपारिक पद्धतीने वांग्याचे भरीत कसे बनवायचे व त्यासाठी लागणारे साहित्य..
साहित्य -
- २ मोठे भरताचे वांगे
- १ टमाटर
- १ मोठा कांदा
- १ वाटी हिरवी फ्रेश मेथी
- ५ ते ६ हिरव्या मिरच्या
- ५ ते ६ कढीपत्त्याची पाने
- अर्धा चमचा हळद
- १ चमचा मोहरी
- १ चमचा जिरे
- १ चमचा बडीशेप
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- तेल
कृती-
सर्वाप्रथम वांगी स्वच्छ धुवून घ्यावीत ,त्यानंतर एका कापडाने वांगी निट कोरडी करून घ्यावीत. त्याला चाकूने मधात २ - ३ चिरे मारून त्याला थोडे तेल लावून घ्यावेत. त्यानंतर गॅसवर मध्यम आचेवर खुरपूस भाजून घ्यावीत.वांगी पूर्ण थंड झाली कि त्याची साल काढून घ्यावीत . जोपर्यंत वांगी थंड होत आहेत तोपर्यंत कांदे, टोमॅटो, मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत. वांगी थंड झाली की त्याचे देठ काढून त्याची साल काढून घ्यावीत आणि त्याचा गर चांगला स्मशर ने घोटून घ्यावा.
त्यानंतर गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे तेल गरम झाले कि . त्यात मोहरी घालावी, मोहरी तडतडल्यानंतरच जीरे, बडीशेप व कढीपत्त्याची पाने घालावी. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, व बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून तो कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावे. कांदा परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर घालावेत 3 ते ४ मिनिटे टमाटर व सर्व टाकलेले पदार्थ कमी आचेवर झाकण तेहून शिजवून घ्यावेत . टोमॅटो शिजुन त्याला तेल सुटू लागले की अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावेत त्यांनतर त्यामध्ये भाजून घेतलेल्या वांग्याचा लगदा घालावा.भरीत परतताना ते भांड्याच्या तळाला चिकटणार नाही याची दक्षता घ्यावी . अगदी कडेने तेल सुटेपर्यंत भरीत जवळजवळ सात ते आठ मिनिटे परतावे .
भरीत तयार त्यात वरून कोथिंबीर घालावी व काढई खाली काढून घावी. गरम गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर हे भरीत खायला फार सुरेख लागते. तर असे झणझणीत वांग्याचं भरीत तुम्हीही करून पाहा.
धन्यवाद !