नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत, इडली हा असा पदार्थ आहे जो संपूर्ण भारतात सर्वात आवडीने खाल्ला जातो. इडली आपण सकाळ, दुपार , सायंकाळ केव्हाही बनवू शकता. बाहेर रोडवर गाड्यांवर सुधा नारळाची चटनी किंवा मग सांबर सोबत हा पदार्थ खायला मिळतो. सर्वांच्याच घरी सुट्ट्टीच्या दिवशी इडली बनवायचा प्रोग्राम असतो. इडली बनवणे खूप सोपे आहे परंतु बरेच वेळा आपली इडली सॉफ्ट बनत नाही आज मी तुम्हाला सॉफ्ट इडली कशी बनवायची तेच सांगणार आहे तर पाहुयात इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य व कृती.
साहित्य -
- २ वाटी तांदूळ (तुम्ही कोणतेही कोरडे तांदूळ वापरू शकता)
- १ वाटी उळद डाळ
- १ वाटी पोहे
- २ -३ चमचे तेल
- चिमुटभर खायचा सोडा
- चवीनुसार मीठ
कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात २ वाटी तांदूळ, १ वाटी उळद डाळ, १ वाटी पोहे व १ हे सर्व पदार्थ घेवून २ ते ३ वेळा हे पदार्थ स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून ते सर्व पदार्थ ५ ते ६ तास भिजत ठेवावे
५ ते ६ तास झाल्यानंतर डाळ व तांदूळ नीट भिजले की, राहलेले पाणी झारून घ्यावेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून थोडे थोडे पाणी घालून तांदूळ व डाळ वाटून घ्यावी व हे मिश्रण एक रात्रभर किंवा मग १० ते १२ तास असच झाकून दमट जागी ठेवावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी इडली च मिश्रण थोड वर आलेले दिसेल त्यामधे चिमुटभर सोडा व चवीनुसार मिठ घालून हे मिश्रण थोडे फेटून घ्यावे. आता इडली पात्र घेऊन त्यामधे खाली थोडे पाणी घालावे त्यांनतर त्या पात्राच्या प्रत्येक साच्याला तेल लावून घ्यावे, प्रत्येक साच्यात थोडे - थोडे इडली चे मिश्रण घालून इडली वाफवण्या करिता गॅसवर कमी आचेवर १० ते १५ मिनीटे झाकण ठेवून वाफ न जाता होऊ द्यावी. १० ते १५ मिनिटानंतर वाफवलेल्या इडल्या थोड्या थंड होऊ द्या व चाकूचा सायाय्याने काढून घाव्यात. अशाप्रकारे आपल्याला सॉफ्ट इडली घरचाघरी बनविता येते.
धन्यवाद !