समोसा

 समोसा


 

                 नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये समोसा कसे  बनवायचे ते पाहणार आहोत. समोसा हा सर्वाच्याच आवडीचा पदार्थ आहे , दही, सॉस, किंवा हिरव्या चटणी सोबत समोस्याची चव दुप्पटन वाढते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने समोसा बनवल्या जाते. लोक फार आवडीने समोसे खातात. बऱ्याच जणांना समोसे बनवणे अवघड वाटते, परंतु तसे नाही खुसखुशीत  समोसे बनविणे खूप सोपे आहे तर पाहुयात समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य व कृती.

साहित्य 

बाहेरील आवरणासाठी लागणारे साहित्य

  • २ वाटी मैदा 
  • १/२ चमचा ओवा 
  • १/२ चमचा मीठ  
  • ३ चमचे  तूप / तेल 

आतमधील सारणासाठी  लागणारे साहित्य

  • ४  उकळलेले साल काढलेले बटाटे
  • १  वाटी कांदा बारीक चिरलेला 
  • ४-५ हिरव्या मिरच्या 
  • १/२ चमचा जिरे 
  • १/२ चमचे मोहरी 
  • १/२ चमचा बडशेप 
  • १ चमचा धणे 
  • १/२ चमचे हिंग
  • १/२ चमचा साखर 
  • १/ २ चमचा गरम मसाला 
  • १/२ चमचा हळद 
  • १/२ चमचा आमचूर पावडर / चाट मसाला
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • तळण्यासाठी तेल

कृती -  

       सर्वप्रथम एका परातीत मैदा चाळून घ्यावा. त्यांनतर त्यामध्ये अर्धा चमचा ओवा व अर्धा चमचा मीठ व तुपाचे  किंवा मग तेलाचं मोहन घालावे. हाताने सर्व तूप मैद्यासोबत रवाळ होयेतोवर मिक्स करून घ्यावे .( तुम्ही इथे डालडा किंवा  वनस्पती तूप किंवा तेल ही वापरू शकता) मैदा भिजवताना कोमट पाणी घालून  घट्टसर पिठ मळून गोळा तयार करून घ्यावा. हा गोळा  १५ ते २० मिनीटे बाजूला झाकून ठेवावा. 

              नंतर  आतमधील सारण करून घ्यावे  त्यासाठी गॅसवर एक कढई मधे तेल गरम होण्यासाठी ठेवावे. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, बडीशेप, जिरे, धणे, हिंग, कढिपत्ता पाने हे सर्व घालून १ मिनिटे परतून झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व मिरचीचे तुकडे घालावेत. कांद्याला  सोनेरी रंग आला की त्यामधे हळद ,चाट मसाला/ आमचूर पावडर/ गरम मसाला, साखर, चवीनुसार मीठ घालावे व सर्व सुके पदार्थ  एकत्रित परतून घ्यावे हवे असल्यास तुम्ही थोडे पाणी घालू शकता. मसाले परतून झाले की  त्यामध्ये ताजे मटर व आलू हाताने चुरून घालावेत  व २ मिनीटे एक वाफ काढून खाली थंड होण्याकरिता उतरून घ्यावे वरून कोथिंबीर घालावी.

               त्यानंतर आता समोसे तयार करण्यासाठी  ते बाजूला झाकून ठेवलेलं पिठ थोड मळून घेवून त्याचे लिंबा येवढे  गोळे करून थोडी अंडाकृती ६ इंचाची थोडी जाडसर पोली लाटून घावी व चाकूचा टोकाला थोडे पाणी लावून त्या पोळीचे दोन भाग करून घ्यावेत. त्यामधला एक भाग घेवून त्याचा उजवे बाजुच्या कडेला पाणी  लावून घ्यावे व  उजवी बाजू डाव्या बाजूला नीट जोडून घ्यावी आता कोनसारखा आकार झाला असेल त्यामधे स्टफिग भरून घ्यावी व त्याचा काठाला पाणी लावून समोसे नीट जोडून घ्यावेत.

            त्यानंतर गॅसवर मोठ्या कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम होण्यासाठी ठेवावे. तेल गरम झाले की मध्यम आचेवर च सर्व समोसे ४ ते ५ मिनीटे परतून लालसर तळून घ्यावेत.
तर आशाप्रकरे खुसखुशीत समोसे आपल्याला घराचा घरी बनविता येतात.

               धन्यवाद !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.