चवळी (बरबटी) डाळीचे कुरकुरीत भजी

 चवळी (बरबटी) डाळीचे कुरकुरीत भजी  




            नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या लेखात चवळी (बरबटी) डाळीचे कुरकुरीत भजी कशी बनवायची ते  पाहणार आहोत. पावसाळा चालू झाला कि , वरून मस्त रिमझिम पाऊस सुरु असताना गरमागरम भजी खाणे,   व पावसाचा आनंद घेणे कुणाला नाही आवडणार. भजी म्हटलं कि लगेच तोंडाला पाणी सुटत, आणि खायची इच्छा होते. आपणच नेहमीच बेसनाचे भजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत  असतो. बेसन पचनाला जड असते किंवा एखाद्याला बेसनाचे भजी आवडतसुद्धा नाहीत तर अशा वेळेस आपण चवळी (बरबटी) चे भजी नक्कीच करू शकतो. चवळी (बरबटी) चे वडे हि तुम्ही कित्येक वेळा बनवून खाल्ले असतीलच ! आज तुंम्ही चवळी (बरबटी) डाळीचे भजी ट्राय करून पहा. ही भजी खायला कुरकुरीत व चविष्ट लागतात. ही भजी दही, सॉस, किंवा हिरव्या मिरच्याची चटणी सोबत अप्रतिम लागतात. चला तर आज पाहूयात चवळी (बरबटी) डाळीचे कुरकुरीत भजी करण्यासाठी लागणारे साहित्य व कृती.


साहित्य - 

  • चवळी (बरबटी) भिजलेली डाळ २ वाटी.
  • २ कांदे उभे चिरलेले 
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  •  १ चमचा लहसून पेस्ट
  • ४-५ कडीपत्ता पाने
  • १ चमचा ओवा 
  • १ चमचा सोप 
  • १ चमचा जिरे 
  • चिमूटभर हळद 
  • तळण्यासाठी तेल  
  • चवीनुसार मीठ 
  • कोथिंबीर 

कृती -

             सर्वप्रथम चवळी (बरबटी) डाळ  ४ तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची , डाळ नीट भिजली कि, अर्धवट, ओबड-धोबड मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यावी. त्यानंतर १ ताटात काढून त्यामध्ये उभे चिरलेले कांदे. हिरव्या मिरच्या व लहसून पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता पाने, १ चमचा ओवा, १ चमचा सोप, १ चमचा जिरे, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ, हे सर्व पदार्थ एकत्रित करून मिश्रण करून घ्यावे. ७ ते आठ मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवावे. 

            त्यानंतर शेगडीवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यानंतर तयार मिश्रणाचे हाताच्या सहाय्याने लहान-लहान भजी तेलामध्ये टाकून लालसर तळून घ्यावी. अशाप्रकारे सर्व भजी तळून घ्यावी. व गरमागरम बटबटीचे डाळीचे भजीचा पावसाळ्यात आनंद घ्यावा.

    

        धन्यवाद !


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.