खुसखुशीत ओल्या नारळाचे पराठे
साहित्य -
- अर्ध्या नारळाची चव
- १ वाटी कणिक
- १ वाटी मैदा
- तेल आणि तूप
- ४ ते ५ हिरव्या मिरच्या
- १ चमचा जिरे
- १ चमचा साखर
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
कृती-
सर्वप्रथम नारळाची चव व नारळाचे पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. ( तुम्ही ओले नारळ किसुन हि घालू शकता ). हिरवी मिरची कोथिंबीर व जिरे याचीही पेस्ट केऊन घ्यावी .
त्यांतर एका ताटामध्ये कणिक व मैदा एकत्रित करून त्यांमध्ये मीठ ,साखर कोथिंबीर ,जीरे व हिरवी मिरचीची पेस्ट घालून १० ते १५ मिनिटे तो गोळा झाकून ठेवावा.(आपण याच गोळ्याच्या पुऱ्या लाटून त्या तळू सुद्धा शकतो ).
आता गॅसवर तवा ठेवून , त्या मिश्रणाच्या गोळ्या चे लहान गोळे करून पोळी सारखे लाटून घ्यावे , तव्यावर एक चमचा तेल अथवा तूप घालावे व दोन्ही बाजूने पराठे नीट भाजून घ्यावेत (तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बटर घालूनही पराठे नीट भाजून घेवू शकता ).
तर तयार झाले आहे आपले खुसखुशीत ओल्या नारळाचे पराठे, दही व चटणीसोबत हे गरमागरम पराठे खायला घ्या. तुम्ही पण करून पहा.
धन्यवाद !