चविष्ट पाकातले चिरोटे (पाकपुऱ्या )

चविष्ट पाकातले  चिरोटे (पाकपुऱ्या )



                नमस्कार मैत्रीनिंनो आज आपण या लेखामध्ये पाकातले चिरोटे (पाकपुऱ्या )कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत , कधी कधी कहीतरी गोड खावस वाटते पण ते कोणता पदार्थ  बनवायचं ते सुचत नाही ,आज  मी तुम्हाला असाच एक गोड पदार्थ सांगणार आहे, जो तुम्हाला परत परत करून खावासा वाटेल ते म्हणजे पाकातले चिरोटे ! फार पूर्वीपासूनच पाकातले चिरोटे हे दिवाळी चा सणाला हमखास बनविल्या  जात होते, परंतु आता दिवाळीच्या सणाला सहसा  कोणी बववू पाहत  नाही, पण मधात केव्हाहि हा पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो. हा गोड पदार्थ  अतिशय चविष्ट  लागतो, अगदी सहजच तोंडात विरघडणारा हा पदार्थ आहे ,हा गोड पदार्थ  बनवायला जास्त  साहित्यची आवश्यकता  नाही  व वेळही फार लागत नाही, याआधी कधी  केलेला नसेल तर लगेच करून बघा घरी सर्वाना नक्कीच आवडेल ! चला तर मग पाकातले चिरोटे कसे बनवायचे आणि ते बनविण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

साहित्य 
  • ४ वाटी रवा 
  • १ वाटी तूप 
  • ३ वाटी साखर
  • पाणी
  • विलायची पूड
  • जायफळ 
  • २ लिंबूचा रस
  • २ चमचे गव्हाचे पिठ 
  • किंचित 
  • मीठ
  • अर्धा किलो तेल तळण्याकरिता

 
  कृती -
            
                सर्वप्रथम एका एका ताटात रवा (नुसत रवा  ऐवजी तुम्मैही रवा  व मैदा  मिक्स  घेवू शकता  मी मैदाचा वापर सहसा कमी करते म्हणून  मी इथे नुसत रवा घेतेलाला आहे तुम्ही तुमचा आवडीनुसार जे आवडेल ते घेऊ शकता )  रव्यामध्ये ४ चमचे कडकडीत गरम तुपाचे मोहन व चिमुटभर टाकावे. त्यांतर ते एकत्रित करून दुधाने किवा पाण्याने त्याचा  घट्टसर गोळा करून १५ ते २० मिनिटे तो नीट डब्यामध्ये झाकून ठेवावा म्हणजे तो छान मुरेल. 
         आता गॅसवर एका भांड्यामध्ये ३ वाटी साखर व  साखर विरघडेल एवढे पाणी घालावे, गोळीबंद  पाक करून  त्यामध्ये विलायची पूड घालावी,चवीसाठी तुम्ही थोडसं जायफळ हि  घालू शकता .त्यांतर त्यामध्ये लिंबाचा रस घालावा .(लिंबामुळे छान आंबट गोड अशी चव येते )
            २ ते ३ चमचे तूप  व कणिक घालून  त्याचा साटा  करून घ्यावा (मी इथे गव्हाचे पिठाचा वापर करत आहे तुम्ही इथे कॉर्न फ्लोअर पण वापरू शकता).पोळपाटावर १ लाटलेली पोळी घ्यावी. त्यावर बनवलेला साटा पसरवावा. त्यावर दुसरी लाटलेली पोळी बरोबर पहिल्या पोळीवर येईल अशी ठेवावी. या पोळीवर पुन्हा साटा लावून त्यावर तिसरी पोळी ठेवून उरलेला साटा यावर लावावा. तिन्ही एकावर एक ठेवलेल्या चपात्यांचा घट्ट रोल करून एक एक इंचाच्या लाट्या चाकूने कापून घ्याव्यात.हाताने दाब देउन चपटे करावे. लाटणे फिरवून साधारण अडीच इंचाची पुरी बनवावी. अशाप्रकारे सर्व चिरोटे बनवावे. तयार झालेले चिरोटे तुपात मंद आचेवर तळावे.चिरोटे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.सर्व चिरोटे थोड खाली उतरून घेतले कि गरम पाकात टाकावे, अर्धा ते एक तासात ते छान मुरतात . हा पदार्थ  दिसायला जेवढा छान दिसतो, तेवढाच खायलाही खुसखुशीत व चविष्ट  लागतो, तर तयार आहेत आपले चविष्ट  पाकातले चिरोटे करून पहा व हा पदार्थ कसा वाटला  कळवा .

                                        धन्यवाद !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.