चटपटीत पास्ता


                                 चटपटीत पास्ता



     

                    नमस्कार मैत्रिनिनो , आज आपण या लेखामध्ये चटपटीत पास्ता कसा बनवावायचा ते पाहणार आहोत , लहान मुलांना रोज रोज भाजी पोळी खायच कंटाळवाणे वाटते, त्यांना  काहीतरी स्पेशिअल,काहीतरी नवीन हवं असत ते जर का चटपटीत असेल  तर मुलं अगदी  खुश होऊन खातात , मुलांना दुपारची भूक लागते ,तर त्यांना  दुपारच काहीतरी  खायला हवं असत !  नुडल्स ,मॅगी, पास्ता असे पदार्थ तर मुले आवडीने खातात, पास्ता  खायला चमचमीत व स्वादिष्ट लागतो कमी तेलात आणि कमी साहित्यात हा पदार्थ अगदी सहज आपण बनवू शकतो, रेस्टॉरंटमधील पास्ता खाण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना घरघुती पद्धतीने हेल्दी पास्ता खाण्यासाठी तयार  करून देवू शकतो. चला तर पाहूयात चटपटीत पास्ता बनविण्यासाठी काय काय साहित्य लागते व तो कसा बनवायचा.

साहित्य -

  •  पास्ता २ वाटी        
  • २ मोठे  टमाटर            
  • १ कांदा     
  • ३ ते ४ लहसून पाकळ्या 
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या 
  • १ ढोबडी मिरची 
  • आवश्यकतेनुसार तेल                         
  • १/२ चमचा मोहरी                 
  • १/२ चमचा जिरे   
  •  पास्ता मसाला   
  •  चवीनुसार मीठ                   
  •  कोथिंबीर      


  कृती-       

            चटपटीत पास्ता बनविण्यासाठी  एका भांड्यात पाणी  घेऊन त्या पाण्याला उकडी येऊ द्यावी. त्या पाण्यत चवीनुसार मीठ व एक चमचे तेल घालून त्यामध्ये पास्ता टाकावा,पास्ता चांगला  १० मिनिटे उकळून घ्यावा , तेलामुळे ते पास्ता एकमेकांना चिकटणार नाही. त्यात पाणी असेल तर ते तुम्ही  काढून टाकू शकता .

            आता एका कढाई मध्ये तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी,जिरे हिरवी मिरची चिरून,व कांदा टाकावा कांदा थोडा लालसर होताच लहसून कापून टाकावा, नंतर एक   ढोबडी मिरची व टमाटर बारीक चिरून टाकावे, व  थोडी हळद  व मीठ थोडेच टाकावे सुरवातीला आपण पास्ता  शिजवताना मीठ टाकलेच आहे!  सर्व पदार्थ एकत्रित निट  शिजवून  घ्यावेत .

                हे सर्व पदार्थ व्यवस्थित शिजल्या नंतर त्यात पास्ता छान परतून घ्या  व पास्ता मसाला टाकून दोन मिनिटे वाफेवर होऊ द्या  व खाली उतरून घ्या  वरून कोथिंबीर घाला ,आपला चटपटीत पास्ता तयार आहे .....

गरम गरम चटपटीत पास्ता  मुलांना खायला द्या व या पदार्थाचा आनंद घेऊ द्या.

                            धन्यवाद ! 

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.