पालक पनीर

                           पालक पनीर 





                        नमस्कार , आज आपण  या लेेखामध्ये पौष्टिक पनीर ची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत, भारतात पालक पनीर ची भाजी खूप आवडीने खाल्ल्या जाते, शाकाहारी लोकांची तर हि सर्वात फेवरेट डिश आहे . पालक आणि पनीर दोन्हीही  खाण्याचे  खूप फायदे आहेत , हि भाजी चवीला अप्रतिम असल्याबरोबरच  आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चव आणि पौष्टिकतेेचा खजिना असलेला हा एक पदार्थ आहे. आठवडयातून एकदा तरी आपण पालक पनीर ची भाजी बनविली  पाहिजे ,म्हणजे घरचेही खुश आणि आपणही खुश,  या भाजीला बनवायला थोडा वेळ लागतो पण स्वाद हि तसाच मिळतो चला तर जाणून घेऊया पालक पनीर ची भाजी !


    साहित्य-  

  • पालक २ जुड्या 
  • पनीर २०० ग्रॅम  
  • १ वाटी तेल
  • २ टमाटर  
  • ४ ते ५ हिरव्या मिरच्या 
  • १ कांदा  
  • ५ ते ६ लहसून पाकळ्या  
  • १ चमचा लाल तिखट 
  • अर्धा  चमचा हळद 
  • कोथिंबीर 
  •  मीठ चवीनुसार 
  • खडा गरम मसाला  ( १ वेलची, १ दालचिनी , १ चक्रिफ़ुल  १ चमचा धने ,१ चमचा जिरे, खोबरे )

 


        
कृती - 

                सर्वप्रथम  पालक स्वच्छ धुवून त्याचे देठ तोडून घ्यावीत , व ती पालक व  ४ ते ५ हिरव्या मिरच्या टाकून  एका भांड्यात गरम पाण्यामध्ये ५ ते ७ मिनिटे वाफवून घ्यावी . पालकाच्या  भाजीचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी  वाफवलेली पालक थंड पाण्यात टाकावी जेणेकरून त्याचा रंग  तसाच राहील , थोडी थंड झाली कि त्या पालकाची  पेस्ट करून घ्यावी , व  टमाटरची  सुद्धा प्युरी  करून घावी,  .एका तव्यावर  कांदा खोबरे व खडे मसाले थोड तेल टाकून लालसर भाजून घ्यावे व पेस्ट करून घ्यावी , आता पनीर चे छोटे तुकडे करून घ्यावेत.

गॅसवर एका कढईमध्ये तेल टाकावे तेल गरम  झाले कि सर्वप्रथम ते पनीर चे तुकडे तळून घ्यावेत ,(पनीर  चे तुकडे तळून घेतल्याने भाजीला छान  चव येते).

 त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा लहसून व खडा मासला ची पेस्ट लालसर होयेतोवर परतून घ्यावी सर्व, मासाल्यामधून तेल सुटायला लागल कि , टमाटर प्युरी घालावी व ती छान  परतून घ्यावी, त्यानंतर  त्यामध्ये १ चमच  लाल तिखट,(आपण भाजीचा कलर बदलू नये ,म्हणून  हिरव्या  मिरच्यांचा वापर केला आहे म्हणून लाल तिखट कमी घालावे).  हळद व  चवीनुसार मीठ  घालून निट परतून घ्यावे . सर्व मसाले एकत्रित होण्याकरिता तुम्ही थोडे पाणी टाकले तर चालेल , सर्व मसाले झाले कि त्यामध्ये पालकाची ग्रेव्ही टाकावी ती निट परतून घ्यावी तुम्हाला हवे असल्यास थोड पाणी टाकू शकता, तशी हि भाजी घट्टसरच असते, नंतर पनीर चे तुकडे घालावे  एक उकळी येताच भाजी काढून घावी जास्त वेळ उकळी येवू नये याची काळजी घ्यावी,  वरून कोथिंबीर टाकावी. तयार  आहे आपली पौष्टिक पालक पनीर भाजी,नक्कीच करून बघा !

                  धन्यवाद !

    

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. एकदम नवीन पद्धत आहे. एकदा करुन पाहते.

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्कीच करून पहा, धन्यवाद !

      Delete
  2. Khup swadisht zali bhaji

    ReplyDelete