आलू पराठा

     आलू पराठा



                       नमस्कार मैत्रीनिंनो आज आपण आलू पराठा कसा  बनवायचा ते पाहणार आहोत. सर्वच महिलांना रोजच्या नाश्त्यात काय बनवा याचा प्रश्न पडत असतो, आलू पराठा पौष्टिक आणी पटकन होणारा सोपा नाश्ता आहे. आपल्या  स्वयंपाक घरातील  उपलब्ध  साहित्यात हा पदार्थ अगदी सहज बनून तयार होतो..लहान मुलानपासून तर मोठ्यांपर्यंत आलू पराठा आवडीने खाल्ला जातो. हिरवी चटणी  ,दही सोबत तर आलू पराठा अप्रतिम  लागतो. चला तर जाणून घेऊया,


        साहित्य- 

  • २ कप गव्हाचे पीठ     
  • ५ उकळलेले बटाटे 
  •  २ कांदे     
  • १ वाटी तेल
  • ३ ते ४ लहसून पाकळ्या     
  • ४ ते ५ हिरव्या मिरच्या   
  • ४ ते ५ कढीपत्ता पाने
  • १ चमच धने 
  • १ चमच मोहरी 
  • १ चमच जिरे 
  • १ चमच सोप 
  • १ चमच  गरम मसाला 
  • १ चमच धणेपूड 
  • १/२ चमच  हळद  
  • कोथिंबीर 
  • चवीनुसार मीठ 


 

           कृती - 

                  प्रथम एका भांड्यात गव्हाच  घेऊन त्यात २ चमचे तेल व मीठ घालून छान  भिजवून घ्यावी. व १५ ते २० मिनिटे बाजूला झाकून ठेवावी. बटाटे सोलून किसून घ्यावे.

                   आता गॅसवर एका कढाईमध्ये २ चमचे तेल घालावे तेल गरम झाले कि त्यांमध्ये मोहरी जिरे घालवी, मोहरी तडतड करताच त्यामध्ये कांदा घालावा कांदा थोडा परतला कि, त्यामध्ये लहसून व मिरचीची पेस्ट  व  कढीपत्ता  पाने घालावी हे सर्व पदार्थ परतून घावे  नंतर हळद, मीठ ,धणेपूड, गरम मसाला व चवीनुसार मीठ घालावे सर्व चं परतून झाले कि, खिसलेले बटाटे घालावे ,व गॅसवरून काढून घ्यावे. 

                          आता एक कणकेचा गोळा घेऊन थोड लाटून हे सारण त्यामध्ये निट भरायचे ,सारण बाहेर येऊ नये याची काळजी घ्यावी. गॅसवर तवा गरम करायला ठेवावा तवा गरम होताच थोड तेल टाकून पराठा छान दोन्ही बाजूने भाजून घ्यावा , तयार  आहे आपला गरमागरम पराठा. नक्कीच करून बघा.

                                    धन्यवाद ! 




Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. करायला अगदी सोप आणि चविष्ट

    ReplyDelete