साबुदाणा आप्पे
साहीत्य -
- २ वाटी साबुदाणा
- ३ ते ४ उकडलेले बटाटे
- ३ ते ४ हिरव्या मिरच्या
- २ वाटी शेंगदाणे
- १/२ चमचा स्पून जिरे
- ४ ते ५ कढीपत्ता पाने
- २ चमचा दही
- १ चमचा साखर
- कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
कृती -
साबुदाणा आप्पे बनविण्यासाठी रात्रभर किवा ७ ते ८ तास साबुदाणा भीजत ठेवावा ज्यामुळे तो चांगला फुलून येतो .२ वाटी शेंगदाणे भाजून मिक्सर मधून जाडसर काढून घ्यावे व हिरवी मिरचीची पेस्ट करून घावी.
एका भांड्यामध्ये भिजलेला साबुदाणा, बारीक केलेले शेंगदाणे,उकडलेले बटाटे, हिरवी मिरची पेस्ट,जिरे,कडीपत्ता पाने बारीक करून,दही ,साखर ( दही व साखर या दोन्हीमुळे आप्याना अप्रतीच चव येते आणि ते छान आंबट गोड लागतात ). कोथिंबीर टाकून सर्व पदार्थ एकत्रित करून त्याचे मिश्रण करून घ्यावे.नंतर मिश्रणाचे गोल - गोल गोळे करून घ्यावे.
आप्पे पात्र गॅसवर ठेवावे ते पात्र गरम झाले कि त्यात दोन दोन थेंब तेल लावून निट पसरून घ्यावे जेणेकरून ते आप्पे चिटकनार नाहीत.आपण केलेले गोळे त्यामध्ये घालावे व व त्यावर झाकण ठेऊन नीट होऊ द्यावे.दुसरी बाजू शेकताना पण दोन दोन थेंब तेल सोडावे व निट दोन्ही बाजूने छान भाजून द्यावे .तयार साबुदाणा आप्पे उपवास असेल तर नारळाच्या चटणीसोबत गरमागरम खायला घ्यावे .
धन्यवाद !
Khrch sabudana usl khaun khaun kantale srv khup chhn appe recipe dili tumhi...🙏
ReplyDeleteधन्यवाद !
Delete