कुरकुरीत कांदा भजी

                               कुरकुरीत कांदाभजी 

    

              नमस्कार गृहीनिनो ,आज आपण या लेखामध्ये कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची हे बघणार आहोत पावसाळा आला कि प्रत्येकाला मस्त गरमागरम भजी खायला  आवडतात आणि ते जर कुरकुरीत असली कि आणखीच मज्जा येते खाण्याची !  कुरकुरीत कांदा भजी बनवताना आपण काही खास टीप पाहणार आहोत  आहोत. कांदा भजी हि एक स्वादिष्ट रेसिपी आहे पावसाळ्यात हा पदार्थ खासकरून बनविल्या व  खाल्ल्या जातो लहसून चटणी,दही  किवा सॉस सोबत कांदा भजी  अप्रतिम लागतात ,आपण कांदा भजी हि जेवणात , नास्त्यामध्येही  केव्हाही  बनवू  शकतो चला तर बघूया कुरकुरीत कांदा भजी रेसिपी कशी बनवायची आणि रेसिपी बनवण्यसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात .                                                                                                                                       

साहित्य :-                  

  •   ४ ते ५ उभे  चिरलेले कांदे
  •  ३ ते ४ हिरव्या मिरच्या 
  •  १ वाटी चणाडाळ पीठ 
  •  १/२ टी स्पून हळद 
  •  १/२ टी  स्पून  जिरे 
  •  १/ २ टी स्पून ओवा 
  •  ४ते ५ कढीपत्ता पाने 
  •  अर्धी वाटी कोथिंबीर
  •  तळण्यासाठी  तेल  

       कृती:-      

                        कुरकुरीत कांदा भजी बनविण्यासाठी एका भांड्यात  १ वाटी चनाडाळ पीठ  घ्यावे,चना  डाळ पीठ कमीच घ्यावे  म्हणजे ते मस्त तळल्या जातात त्या पिठात  उभे चिरलेले कांदे चवीनुसार मीठ ,किंचित हळद ,ओवा जिरे ,बारीक चिरून  कढीपत्याची   पाने  हिरवी मिरची पेस्ट करून घालावी  करण लहान मुले सुद्धा कांदा भजी खातात त्यामुडे त्यांना मिरची तिखट लागू शकते  म्हणून शक्यतोवर  हिरवी  मिरचीची पेस्टच घालावी  व कोथिंबीर  घालून ते सर्व एकत्र करावे .

                एका  कढई मध्ये  तेल गरम करायला ठेवावे तेल गरम झाले कि त्यामधील २ टी  स्पून तेल आपण जे मिश्रण तयर केल त्यात टाकावे  म्हणजे ते भजी  मस्त कुरकुरीत होतील. ते मिश्रण कोरड वाटत असेल तर त्यावर थोडा पाण्यचा शिरवा द्यावा ,जास्त पाणी घालू नये नहीतर आपली भजीच मिश्रण पातळ होऊ शकत . आता  हाताच्या  सहय्याने सर्व भजी  तळून घ्यावीत .आपली कुरकुरीत कांदा भजी झालेली  आहे.


   महत्वाचे :-   

  • कुरकुरीत कांदा भजी  बनवतांना   त्यामध्ये सोडा घालू नये. 
  •  जास्त प्रमाणात पाणी घालू नये नाहीतर मिश्रण पातळ होईल.
  •  भजी हाताच्याच सहाय्याने तेलामध्ये टाकावी तुम्ही  चमच्याने टाकल्यास कांदा भाजीचा आकार बदलू शकतो .

                 वरील रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा , व यशस्वी झाल्यास नक्कीच कळवा.

Post a Comment

4 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. अगदी तू सांगितले तस केले मी , माझ्या घरी सर्वाना खुप आवडले

    ReplyDelete
  2. चवदार, टेस्टी.

    ReplyDelete