नमस्कार गृहीनिनो, आज आपण या लेखामध्ये ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची हे बघणार आहोत.
शेवभाजी म्हटलं की
अस तोंडाला पटकन पाणी सुटतच.आणि ती अशी झणझणीत, चमचमीत दिसली समोर की लगेच भूक लागायला होतं.
हा एक सामान्य खानदेशी पदार्थ आहे.
खानदेश प्रदेशात आणी विशेषता जळगाव मध्ये सर्वात लोकप्रिय अशी हि भाजी आहे. विशेष
करून तिथल्या धाब्यावर ज्या पद्धतीने शेवभाजी बनविली जाते, त्याच पद्धतीने आज आपण धाबा स्टाईल शेवभाजी बनविणार आहोत. चला तर
बघूया धाबा स्टाईल शेव भाजी.
साहित्य :-
- १ मोठी वाटी जाड शेव
- १ मोठा कांदा
- १ टमाटर
- १० ते १२ लहसून पाकळ्या
- साधारणता १ वाटी तेल
- हळद १ छोटा चम्मचं
- लाल तिखट २ चम्मचं
- मीठ चवीनुसार
- कोथिंबीर
खडा मसाला :-
- अर्धी वाटी सुखे खोबरे
- एक चक्रीफुल
- दालचिनी चवीनुसार
- २ ते ४ मिरे
- जिरे १ चमचा
- १ विलायची, १ लवंग
- १ चमच धने
- अर्धा चमचा खसखस
कृती :-
गॅसवर एका कढाई मध्ये एक चमचा तेल टाकावे, तेल गरम झाल्या की, त्यामध्ये आपण एक उभा चिरलेला कांदा मस्त पैकी लालसर होई पर्यंत परतून घ्यावा
कांदा झाला की, सुके खोबरे न टाकता खडा मसाला टाकावा.
त्यानंतर सुके खोबरे परतून घ्यावे. त्यानंतर लहसून अद्रक व कोथिंबीर घेउन बारीक
पेस्ट करावी. एक मोठा टमाटर चिरून त्याचीही पेस्ट करून घ्यावी.
त्याच कढाई मध्ये तेल गरम करून त्यात थोडी मोहरी घालावी, मोहरी तळतळ होताच मसाला पेस्ट मस्तपैकी लालसर होई पर्यंत परतून घ्यावी व नंतर टमाटर प्युरी घालावी.सर्व पदार्थाना तेल सुटत नाही तोपर्यंत नीट सर्व मसाले होऊ द्यावे. तेल सुटलं की
त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट , एक छोटा चमच हळद व चवी नुसार मीठ
घालावे. एक ते दीड ग्लास पाणी घालून एक ते दोन वेळा उकळी येऊ द्यावी. व त्यामध्ये
कोथिंबीर घालावी. भाजी थोडी थंड झाली की नंतर त्यामध्ये शेव टाकावे. म्हणजे ते शेव
गरम पणाने विरघळून जाणार नाही.
तर आता तयार झालेली आहे आपली गरमागरम,झणझणीत,चमचमीत ढाबा स्टाईल शेव भाजी. तर कशी
वाटली शेव भाजी कळवा.
धन्यवाद!
खूच सोपं सुटसुटीत
ReplyDeleteधन्यवाद !
DeleteTesty yum yum
ReplyDeletevery nice Ji 😊
Delete